छत्रपती संभाजीनगरमध्ये एसआयआर अभियानासाठी भाजपाची बैठक
छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै (हिं.स.) । पूर्व विधानसभा मतदारसंघातील SIR अभियानाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस भाजपा सिडको मंडळ, गारखेडा मंडळ आणि कैलासनगर-राजाबाजार मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै (हिं.स.) । पूर्व विधानसभा मतदारसंघातील SIR अभियानाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या बैठकीस भाजपा सिडको मंडळ, गारखेडा मंडळ आणि कैलासनगर-राजाबाजार मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. बैठकीत SIR अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मतदारांशी संपर्क, नियोजन, समन्वय तसेच आगामी कार्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी नगरसेवक श्री. शिवाजी दांडगे, श्री. विश्वनाथ स्वामी, माधुरी अदवंत, मंडळ अध्यक्ष श्रीनिवास देव, संजय बोराडे आणि निखिल महाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे सहभागी होऊन मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande