वर्धा जिल्ह्यात १५ दिवसांत १५४ वीजचोऱ्या उघड
वर्धा, 18 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यात वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. वर्धा मंडळातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे वीजचोरांत खळबळ उडाली आहे. जुलै महिन्याच्या १५ दिवसांच्या कालावधीत महावितरणच्
वर्धा जिल्ह्यात १५ दिवसांत १५४ वीजचोऱ्या उघड


वर्धा, 18 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यात वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. वर्धा मंडळातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे वीजचोरांत खळबळ उडाली आहे. जुलै महिन्याच्या १५ दिवसांच्या कालावधीत महावितरणच्या संचलन व सुव्यवस्था विभागामार्फत जिल्ह्यातील विविध भागांत तपासणी केली असता, तब्बल १५४ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत.

या विशेष मोहिमेची व्याप्ती मोठी असून, महावितरणने वर्धा मंडळांतर्गत असलेल्या सर्व उपविभागांमधील वीजजोडण्यांची कसून तपासणी केली. या १५ दिवसांच्या काळात महावितरणच्या पथकांनी एकूण नऊ हजार ६५४ ठिकाणांची प्रत्यक्ष तपासणी केली. या मोहिमेत वीज कायद्याच्या विविध कलमांनुसार अनियमितता आढळून आल्या आहेत. वीज कायद्यानुसार १४८ प्रकरणांमध्ये वीजचोरी उघड झाली आहे, तर सहा ठिकाणी अनधिकृत वीज वापराच्या घटना आढळून आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण १५४ ठिकाणी वीज चोरी किंवा अनधिकृत वीज वापराची प्रकरणे समोर आली आहेत.

दोन लाखांची वसुली

या धडक कारवाईमुळे महावितरणने १९ हजार ८७१ युनिट्सची वीजचोरी उघड केली आहे. या चोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले होते, ज्याची भरपाई करण्यासाठी ३ लाख ५८ हजार रुपयांचे देयक संबंधितांना आकारण्यात आले आहे. त्यापैकी एकूण २ लाख ९ हजार रुपयांची यशस्वीरीत्या वसूल केली आहे.

विभागनिहाय चोरीचे प्रकरण

वर्धा- ५७

आर्वी-५२

हिंगणघाट-४५

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande