अमरावतीतील येलगुंडा येथे युरिया खाल्ल्याने ३१ मेंढ्या दगावल्या
अमरावती, 18 जुलै (हिं.स.)| येलगुंडा येथील मेंढपाळ शंकर हाके हे आपल्या मेंढ्या घेऊन रत्नापूर शिवारात चराईसाठी गेले होते. अनोळखी इसमाने या ठिकाणी युरिया टाकून ठेवला होता. हा युरिया मेंढ्यांनी खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन कळपातील ३१ मेंढ्या जागीच मृत झाल
युरिया खाल्ल्याने ३१ मेंढ्या दगावल्या


अमरावती, 18 जुलै (हिं.स.)| येलगुंडा येथील मेंढपाळ शंकर हाके हे आपल्या मेंढ्या घेऊन रत्नापूर शिवारात चराईसाठी गेले होते. अनोळखी इसमाने या ठिकाणी युरिया टाकून ठेवला होता. हा युरिया मेंढ्यांनी खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन कळपातील ३१ मेंढ्या जागीच मृत झाल्या तर १५ अत्यवस्थ आहेत.

ही दुर्दैवी घटना घडली. गुरुवारी (ता. १६) घडली. येलगुंडा येथील मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन मोझर, रत्नापूर परिसरात गेले होते. परिसरातील चराईयुक्त व पडीक जमिनीवर नेहमीप्रमाणे गुरुवारी शंकर हाके हे रत्नापूर या परिसरात मेंढ्या चारत होते. सायंकाळी पाच वाजता चे दरम्यान अचानक मेंढ्या फुगून मृत्यू पावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसराची पाहणी केली असता त्या ठिकाणी मुद्याम काही अनोळखी व्यक्तीने मेंढ्या मराव्या म्हणून जागोजागी युरिया ठेवला होता. या युरियाचे सेवन केल्यामुळे मेंढ्या मृत झाल्यात. यात मेंढपाळाचे अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले. घटनेची नेर पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिस तपास करीत आहेत. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन मेंढ्यांचे शवविच्छेदन केले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande