
छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै (हिं.स.)। उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय. जालना यांच्या वायुवेग पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवून एकूण 60 बसेसची तपासणी केली. सदर कारवाईत मोटार वाहन निरीक्षक फारुक एस. शेख, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभिजित के. बावसकर तसेच वाहन चालक ज्ञानेश्वर निळे यांनी सहभाग घेतला.
तपासणी दरम्यान 26 बसेसमध्ये मोटार वाहन कायद्याचे विविध उल्लंघन आढळून आले. त्यामध्ये प्रामुख्याने विनापरवाना वाहतूक. मोटार वाहन कर न भरणे इंडिकेटर टेल लाइट बंद असणे, केबिनमध्ये अनधिकृत प्रवासी वाहतूक करणे तसेच वाहनाच्या टपावर माल वाहतूक करणे अशा गंभीर स्वरूपाच्या त्रुटींचा समावेश होता.
सदर उल्लंघनांबाबत संबंधित वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, 1988 व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात आली असून एकूण 1 लाख 90 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्यामार्फत सर्व बसचालक वाहनमालक तसेच प्रवासी वाहतूक व मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की. रस्ते सुरक्षितता, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारे सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis