लातूर पोलिसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
विशेष मोहिमेत १,४४० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई लातूर, १८ जुलै (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांनी वाहतूक नियमांची विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली. या मोहिमेत मोटार वाहन कायद्यानुसार तब्बल १,४४० वाहनचा
पोलीस कारवाई


विशेष मोहिमेत १,४४० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

लातूर, १८ जुलै (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांनी वाहतूक नियमांची विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली. या मोहिमेत मोटार वाहन कायद्यानुसार तब्बल १,४४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे ही विशेष मोहीम राबवली.

या कारवाईमध्ये विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या ८०६ चालकांवर, सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या २३६ चालकांवर, राँग साईडने वाहन चालविणाऱ्या २३२ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या १३३ चालकांवर, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १०२ चालकांवर आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या ६४ चालकांवर कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच पोलिसांनी अपघातप्रवण ठिकाणी जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande