फुलंब्री जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून आ. अनुराधा चव्हाण यांच्या कडून तक्रारींची दखल
छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै (हिं.स.)। फुलंब्री तालुक्यात आयोजित जनता दरबारात शेकडो नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न, तक्रारी व मागण्या लेखी स्वरूपात मांडल्या. प्रत्येक विषयाची सविस्तर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अशी माहि
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै (हिं.स.)। फुलंब्री तालुक्यात आयोजित जनता दरबारात शेकडो नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न, तक्रारी व मागण्या लेखी स्वरूपात मांडल्या. प्रत्येक विषयाची सविस्तर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली आहे.

रोजगार हमी, कृषी, महसूल, घरकुल, महावितरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम आदी अनेक प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. ज्या प्रकरणांमध्ये प्रशासकीय कार्यवाही आवश्यक आहे, त्याबाबत संबंधित विभाग व पदाधिकाऱ्यांना एक महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. समस्या प्रत्यक्ष मार्गी लागाव्यात यासाठी प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे. एक महिन्यानंतर कार्यवाहीचा आढावा घेत पुन्हा जनता दरबार आयोजित करण्यात येणार असून, प्रलंबित प्रश्नांच्या निवारणावर विशेष भर दिला जाईल. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी दर शुक्रवारी फुलंब्री तहसील कार्यालय येथे व दर सोमवारी छत्रपती संभाजीनगर तालुका जनसंपर्क कार्यालय येथे जनता दरबाराचे नियमित आयोजन करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande