पोलीस स्टेशनच्या हद्दीत विष प्राशन करून आत्महत्या प्रकरण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश
चंद्रपूर, 18 जुलै (हिं.स.)। चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने रा
पोलीस स्टेशनच्या हद्दीत विष प्राशन करून आत्महत्या प्रकरण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश


चंद्रपूर, 18 जुलै (हिं.स.)। चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

तपासात संपूर्ण निष्पक्षता राहावी यासाठी न्यायालयीन प्रक्रिये नूसार मृतक इसमाचा 'इनक्वेस्ट पंचनामा स्वतः विशेष दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली कायदेशीररीत्या पूर्ण करण्यात आला आहे.

मृत्यूचे अचूक व तांत्रिक कारण समोर यावे यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) तज्ज्ञ वैद्यकीय चमूद्वारे (Medical Team) करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात आली आहे.

तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्गः सदर प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय तपास व्हावा, या दृष्टीने पोलीस अधीक्षक यांच्या शिफारसी वरुन या प्रकरणाचा पुढील तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपविण्यात आला असुन पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे.

सदर प्रकरणाचा कायदेशीर तपास प्रक्रिया सखोल आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande