
पुणे, 18 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतदारांसाठी १९ जुलै २०२६ रोजी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दोन दिवसांत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रांवर सर्व सहायक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदारांकडून गणना प्रपत्र स्वीकारणार आहेत.
त्यामुळे मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले भरलेले गणना प्रपत्र संबंधित मतदान केंद्रावर जमा करावे. या विशेष सुविधेचा लाभ घेऊन मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ, सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु