
नांदेड, 18 जुलै, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी देगलूर पोलीस ठाण्याला भेट देत पोलीस कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, प्रलंबित प्रकरणे आणि नागरिकाभिमुख पोलीस सेवेबाबत आवश्यक सूचना दिल्या.
तसेच, गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे करण्याबरोबरच नागरिकांना तातडीने आणि दर्जेदार सेवा देण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या भेटीदरम्यान पोलीस ठाण्यातील विविध नोंदी, सुविधा आणि प्रशासनिक कामकाजाची पाहणी करण्यात आली. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही देगलूर पोलीस स्टेशन येथे पहिलीच भेट होती
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis