
नाशिक, 18 जुलै (हिं.स.)। नाशिक त्रंबक रस्त्यावरती असलेल्या दुगारवाडी येथील धबधबा हा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून त्याबाबतचा आदेश हा काढण्यात आला आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये दुगारवाडीचा धबधबा हा पर्यटकांना बंद झाला आहे.
पावसाळा चालू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ती पर्यटकांची मोठ्या प्रमाणावरती निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी तयारी सुरू असते पावसाळ्याचे चार महिने नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळावरती सातत्याने नागरिकांची गर्दी होत असते त्यातून काही दुर्घटना देखील होत असतात अशीच एक दुर्घटना नाशिक त्रंबक रोडवरील दुगारवाडी येथील धबधब्या वर झाली आहे वनविभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वी नागरिकांना पर्यटन स्थळावरती जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. पण तरी देखील नागरिकांकडून फारशी काळजी घेतली जात नसल्याचे काल नाशिक रोड येथील मित्रपरिवाराबरोबर गेलेल्या अभिजीत पवार वीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले.
या घटनेनंतर वनविभागाने अतिशय कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला असून त्र्यंबकेश्वर परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी शुक्रवारी सकाळी एक आदेश प्रकाशित केला असून या देशांमध्ये एकूणच सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जोपर्यंत पुढील आदेश होत नाही तोपर्यंत दुगारवाडी येथील धबधब्यावरती जाण्यासाठी पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे नागरिकांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे असा इशारा देण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी देवकर यांच्या या निर्णयामुळे आता दुगारवाडीचा धबधबा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला असून शुक्रवारपासून अनिश्चित काळापर्यंत हा बंद झाला आहे त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी जाऊ नये प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान देखील वनविभागाच्या वतीने देवकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV