नेरळ येथे महिला कौशल्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांना स्वयंरोजगाराचे धडे
रायगड, 18 जुलै (हिं.स.) : सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना महेश विरले यांच्या सौजन्याने आगरी समाज हॉल, नेरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला कौशल्य प्रशिक्षण शिबिराला नेरळ व परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध गावांतील मोठ्या संख्य
Employment-oriented training for women, courtesy of Jyotsna Mahesh Virle.


Employment-oriented training for women, courtesy of Jyotsna Mahesh Virle.


रायगड, 18 जुलै (हिं.स.) : सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना महेश विरले यांच्या सौजन्याने आगरी समाज हॉल, नेरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला कौशल्य प्रशिक्षण शिबिराला नेरळ व परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध गावांतील मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

या शिबिरामध्ये राज फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गाठे सर यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या विविध संधी, लघुउद्योगाची संकल्पना तसेच घरबसल्या व्यवसाय उभारण्याच्या मार्गांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कमी भांडवलात व्यवसाय कसा सुरू करता येईल, याची माहितीही त्यांनी दिली.

प्रशिक्षणादरम्यान मेणबत्त्या, लिक्विड फिनेल, अगरबत्ती, सेंट तसेच स्टॉकिंगपासून आकर्षक फुले तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी विविध उत्पादने तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यामुळे उत्पादन प्रक्रिया, साहित्याची निवड, गुणवत्ता नियंत्रण आणि विक्रीच्या संधी याबाबत महिलांना उपयुक्त माहिती मिळाली.

या कार्यक्रमाला कोल्हारे ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांची उपस्थिती लाभली. महिलांच्या कौशल्यविकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत भविष्यातही अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रशिक्षणानंतर अनेक महिलांनी घरातून लघुउद्योग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. आर्थिक स्वावलंबनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत सहभागी महिलांनी मांडले.

या शिबिरामुळे महिलांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा, आत्मविश्वास आणि नवीन कौशल्ये विकसित करण्याची संधी निर्माण झाली असून ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

आयोजकांनी भविष्यातही महिलांसाठी कौशल्य विकास, उद्योजकता आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण शिबिरे सातत्याने आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

-------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande