अहमदपूरच्या नव्या वनपरिमंडळ अधिकाऱ्यांचा सत्कार
संतोष बन यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत मान्यवरांकडून गौरव लातूर, १८ जुलै (हिं.स.) : अहमदपूर येथील वनपरिमंडळ अधिकारी कार्यालयात नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी संतोष बन यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्
संतोष बन यांचा सत्कार


संतोष बन यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत मान्यवरांकडून गौरव

लातूर, १८ जुलै (हिं.स.) : अहमदपूर येथील वनपरिमंडळ अधिकारी कार्यालयात नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी संतोष बन यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

संतोष बन हे कर्तव्यनिष्ठ आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी निलंगा आणि लातूर येथे वन विभागात सेवा बजावली असून, आता अहमदपूर येथे वनपरिमंडळ अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

वन विभागातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संतोष बन यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande