
बीड, 18 जुलै (हिं.स.) राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गेवराई आगाराला नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेस उपलब्ध करण्याबाबत अधिवेशन काळात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आमदार विजयसिंह पंडित यांनी भेट घेऊन याबाबतची मागणी केली होती. आज गेवराई आगारासाठी 'राजमाता जिजाऊ' या ३ x २ आसन रचनेच्या पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत.
गेवराई आगारातून मुंबई, पुणे, कल्याण, सोलापूर, पंढरपूर आदी ठिकाणी लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू आहेत. नवीन पाच बसेस गेवराई आगारात सामील होत असल्यामुळे लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील बसफेऱ्यांनासुद्धा आता चांगल्या दर्जाच्या बसेस उपलब्ध होतील, याची मला खात्री वाटते. प्रवाशांना स्वच्छ व वेळेवर बससेवा मिळण्यासाठी नक्कीच या नवीन बसेसचा फायदा होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मनःपूर्वक आभार. असेही आमदार पंडित म्हणाले
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis