
छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै (हिं.स.)। फुलंब्री तालुक्यातील पाल येथे श्री.ज्ञानेश्वर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या पीक कर्जमाफी आणि वीजबिल माफीच्या ऐतिहासिक निर्णयांवर विश्वास व्यक्त करत ज्ञानेश्वर जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
भारतीय जनता पक्षाची विचारधारा आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत. त्यांच्या प्रवेशामुळे फुलंब्री तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक बळकट होऊन जनसेवेच्या कार्याला आणखी गती मिळणार आहे.
यावेळी आमदार सुहासभाऊ शिरसाठ, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रीराम बाबा शेळके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र बाबा जैस्वाल, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सजन नाना मते, शिवाजीराव पाथ्रीकर, जिल्हा परिषद सदस्य अजिनाथ धामणे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष सांडूअण्णा जाधव, नगरसेवक योगेश मिसाळ, बाजार समिती संचालक आप्पासाहेब काकडे, राजू डकले, उपसभापती अश्विनीताई सोनवणे, हौसाताई काटकर, ऐश्वर्याताई गाडेकर तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis