लातूर–नांदेड महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक जखमी
लातूर, 18 जुलै (हिं.स.)। लातूर–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावाजवळ शनिवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका मोटारसा
अपघात


लातूर, 18 जुलै (हिं.स.)। लातूर–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावाजवळ शनिवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एका मोटारसायकलने समोरून जात असलेल्या दुसऱ्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात देविदास सखाराम चव्हाण (रा. वरवटी तांडा, ता. अहमदपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande