बीड - लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
बीड, 18 जुलै (हिं.स.)। शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदना आपल्या लेखणीतून व शाहिरीतून जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. समता, सामाजिक न्याय आणि मानवी मूल्यांसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रे
अ


बीड, 18 जुलै (हिं.स.)। शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदना आपल्या लेखणीतून व शाहिरीतून जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. समता, सामाजिक न्याय आणि मानवी मूल्यांसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. असे मत गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केले

बीड येथे त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे व पालिका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, सभापती शेख निजाम, गटनेते फारुक पटेल, बळीराम आप्पा गवते, मनोज गोडसे, नगरसेवक भीमराव वाघचौरे, नगरसेवक मोईन मास्टर साहेब, अशोक हिंगे, बाप्पा घुगे, नगरसेवक महेश धांडे, नगरसेवक रंजीत बनसोडे, विजय चांदणे, दादा हातागळे, महेश राऊत, संदीप पाटील, बाळू धोत्रे, ॲड. अजिंक्य पांडव यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande