रायगड पोलिसांची दमदार कामगिरी; ९ सुवर्ण, ६ रौप्य, ७ कांस्यांसह विजेतेपद
रायगड, 18 जुलै (हिं.स.)। रायगड पोलीस दलाने २१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. विविध स्पर्धात्मक प्रकारांमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर रायगड पोलीस दलाने कोकण परि
Impressive performance by Raigad Police; championship title won with 9 gold, 6 silver, and 7 bronze medals.


Impressive-performance-by-Raig


रायगड, 18 जुलै (हिं.स.)। रायगड पोलीस दलाने २१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. विविध स्पर्धात्मक प्रकारांमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर रायगड पोलीस दलाने कोकण परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

या मेळाव्यात एकूण सहा स्पर्धात्मक विषयांमध्ये रायगडच्या अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनीय यश संपादन केले. संघाने ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण २२ पदके जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान मिळविले. या शानदार कामगिरीमुळे रायगड पोलीस दलाला सर्वसाधारण विजेतेपदाची मानाची ट्रॉफीही मिळाली.

स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्या अधिकारी व अंमलदारांना पदके, प्रशस्तीपत्रे तसेच सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धा यशस्वी, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी योगदान देणाऱ्या परीक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सर्व विजेते आणि सहभागी अधिकारी-अंमलदारांचे अभिनंदन केले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही रायगड पोलीस दलाने अशीच उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक अधिक उंचवावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. रायगड पोलीस दलाचे हे यश अधिकारी व अंमलदारांच्या कठोर परिश्रम, शिस्त, व्यावसायिक कौशल्य आणि उत्कृष्ट संघभावनेचे प्रतीक मानले जात असून, या दैदिप्यमान कामगिरीमुळे संपूर्ण पोलीस दलाच्या गौरवात भर पडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande