जालना जि. नियोजन समितीच्या बैठकीत विकास, कायदा-सुव्यवस्था व शेतकरी प्रश्नांवर सखोल चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै, (हिं.स.)। जालना जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील विकासकामे, कायदा व सुव्यवस्था, शेतकरी प्रश्न, प्रशासनातील विविध समस्या तसेच विभागनिहाय प्रलंबि
Q


छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै, (हिं.स.)। जालना जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील विकासकामे, कायदा व सुव्यवस्था, शेतकरी प्रश्न, प्रशासनातील विविध समस्या तसेच विभागनिहाय प्रलंबित तक्रारींचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

यावेळी विविध विकासकामांमध्ये होत असलेल्या अनियमिततेबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेत पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांनी जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला. जनतेच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी परस्पर सहकार्याने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

या बैठकीस खासदार कल्याण काळे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार विक्रम काळे, आमदार हिकमत उढान, आमदार संतोष दानवे, आमदार सुहास शिरसाट, जिल्हाधिकारी असिमा मित्तल, मनपा आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना मगरे, भा.प्र.से. डॉ. कृष्णकांत कनवरिया, उपमहापौर राजेश राऊत तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे, प्रशासन अधिक कार्यक्षम बनविणे आणि नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विकासकामांना अधिक वेग मिळेल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande