फुलंब्रीत एसआयआर अभियानाबाबत भाजपची बैठक; मतदार नोंदणीवर भर
छत्रपती संभाजीनगर, १८ जुलै (हिं.स.) : विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या अनुषंगाने फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील मुकुंदवाडी, श्रीरामनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आमदार अनुराधा
अ


छत्रपती संभाजीनगर, १८ जुलै (हिं.स.) : विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या अनुषंगाने फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील मुकुंदवाडी, श्रीरामनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवणे तसेच प्रत्येक पात्र मतदारापर्यंत अभियानाची माहिती पोहोचविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार नोंदणी निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावी आणि बूथस्तरावर एसआयआर अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीला आमदार सुहासभाऊ शिरसाठ, एसआयआर बीएलओ-१ फुलंब्री विधानसभा प्रमुख अजिनाथ धामणे, माजी महापौर बापू घडामोडे, भाजप मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक सुनील जगताप, नगरसेवक रवि कावडे, नगरसेवक मनोज गांगवे, नगरसेविका कमलताई नरोटे, प्रियंकाताई खोतकर, मुक्ताताई ठुबे, गंगुताई भवरे, बीएलओ-२ तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande