आमदार प्रताप चिखलीकरांनी जनता दरबारात जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
नांदेड, 18 जुलै (हिं.स.) : लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर, नांदेड येथील ‘साई सुभाष’ जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि निवेदनांची त्यांनी दखल घ
अ


नांदेड, 18 जुलै (हिं.स.) : लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर, नांदेड येथील ‘साई सुभाष’ जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि निवेदनांची त्यांनी दखल घेतली.

जनता दरबारात नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर प्राधान्याने कार्यवाही व्हावी, या उद्देशाने आमदार चिखलीकर यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. अनेक प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काही प्रलंबित विषयांवर तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार चिखलीकर यांनी सांगितले. तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोहा मतदारसंघातून बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याबद्दल नागरिकांनी दिलेल्या शुभेच्छांचा त्यांनी मनःपूर्वक स्वीकार केला.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande