
लातूर, 18 जुलै (हिं.स.) : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा अवघ्या दोन दिवसांत छडा लावत चाकूर पोलिसांनी मुलीचा सुखरूप शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध १५ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. एन. सूर्यवंशी यांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, विविध ठिकाणी शोधमोहीम, नातेवाईक व परिचितांकडे चौकशी तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधकार्य सुरू ठेवले.
अथक प्रयत्नांनंतर चाकूर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अल्पवयीन मुलीचा सुखरूप शोध घेतला. चौकशीदरम्यान संबंधित मुलगी स्वतःच्या इच्छेने घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या तत्पर कारवाईबद्दल चाकूर पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis