वर्धा : बीएलओ शिक्षकांचे निलंबन रद्द करा अन्यथा बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा
वर्धा, 18 जुलै (हिं.स.)। विशेष सखोल पुर्ननिरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत बीएलओ म्हणून नियुक्त महिला आश्रम बुनियादी प्राथमिक शाळा, वर्धा येथील सहाय्यक शिक्षक गजानन माहुरे, यशवंत विद्यालय, सेलू येथील सहाय्यक शिक्षक धनश्री राऊत, रवींद्रनाथ टागोर हा
'त्या' बीएलओ शिक्षकांचे निलंबन रद्द करा अन्यथा बेमुदत अन्नत्याग आंदोलन


वर्धा, 18 जुलै (हिं.स.)। विशेष सखोल पुर्ननिरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत बीएलओ म्हणून नियुक्त महिला आश्रम बुनियादी प्राथमिक शाळा, वर्धा येथील सहाय्यक शिक्षक गजानन माहुरे, यशवंत विद्यालय, सेलू येथील सहाय्यक शिक्षक धनश्री राऊत, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल सिंदी (मेघे) वर्धा येथील प्रयोगशाळा परिचर सुनील कोंडलकर यांचे निलंबन करण्यात आले. ते मागे घ्यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांचे नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मतदार यादी पुर्नपरीक्षणाचे काम प्रत्यक्ष निवडणुकीचे काम नसतांना बीएलओ म्हणून नियुक्ती संदर्भात आवश्यक कर्मचाऱ्यांमधे शिक्षकांचा क्रम जवळपास शेवटचा आहे. ज्या ठिकाणी शिक्षका व्यतिरिक्त इतर कर्मचारी उपलब्ध नाही अशाच ठिकाणी शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्ती देण्याबाबत सुचना आहेत.

मात्र वर्धा जिल्ह्यात शिक्षकांच्याच सेवा मोठ्या प्रमाणात अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे. धनश्री राऊत, गजानन माहुरे, सुनील कोंडलकर आपले काम करत असतांना त्यांच्या वास्तव अडचणी व आजारपण लक्षात न घेता त्यांना निलंबित करणे अवाजवी व अनाकलनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अशा प्रकारे कोणाचे निलंबन व कोणत्याही प्रकारे कठोर कारवाईमुळे तणावग्रस्त होऊन मुंबई महानगरात घडलेल्या आत्महत्या सारख्या घटना घडू शकतात. याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने व सकारात्मक विचार करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व बीएलओंसह बेमुदत उपोषण करण्याचा व कोविडच्या काळात जिल्हा प्रशासनाकडून दिलेला पुरस्कार परत करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला. उपस्थित प्रहार शिक्षक संघटनेचे धनराज कावटे, मुकेश इंगोले, दत्तात्रय राऊळकर, मनीष मारोडकर, अविनाश धात्रक, संतोष महाजन सह मोठ्याप्रमाणात शिक्षक उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande