
वर्धा, 18 जुलै (हिं.स.)। पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत जप्त केलेला दारूसाठा नष्य करण्यात आला. देवळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईत १४ लाख ९१ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. वर्धा दारूबंदी जिल्हा असून देवळी पोलिसांकडून विविध प्रकारच्या देशी व विदेशी दारूच्या कारवाया करून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यापैकी १५९ दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्यात आला. ही कारवाई न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आली.
या कारवाईत देशी दारूच्या ८ हजार १७६ बाटला एकूण १७० पेटी व विदेशी दारूच्या १ हजार ४४ बाटला एकूण २१ पेटी असा मुददेमाल देवळी येथील निर्जल स्थळी नेत त्यावर रोड रोलर चालवन नाश केले आहे. त्या दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, अंमलदार तसेच पंच, देवळी पोलिस ठाण्याचा स्टाफ उपस्थित होता.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी