सोलापुरात २५ जुलैला श्री शुभराय महाराज मठाची भव्य रथयात्रा
सोलापूर, १८ जुलै (हिं.स.) : सोलापूर शहराची सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या दक्षिण कसबा, दत्त चौक येथील ऐतिहासिक श्री शुभराय महाराज मठाच्या वतीने यंदाही आषाढी वारीनिमित्त भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रथयात्रा शनिवार, २५
Fnbf


सोलापूर, १८ जुलै (हिं.स.) : सोलापूर शहराची सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या दक्षिण कसबा, दत्त चौक येथील ऐतिहासिक श्री शुभराय महाराज मठाच्या वतीने यंदाही आषाढी वारीनिमित्त भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रथयात्रा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी पार पडणार असून, संपूर्ण सोलापूर शहर विठ्ठल नामाच्या जयघोषाने भक्तिमय होणार आहे.

भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल युगेन युगे विटेवरी उभा जसा, श्री शुभराय महाराजांसाठी पांडुरंग सोलापुरी तसा!” या भक्तीभावनेचा वारसा जपत ही रथयात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजित केली जाते.

मठाच्या माहितीनुसार, भगवान श्री विठ्ठलाची पारंपरिक रथयात्रा शनिवार, २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता श्री शुभराय महाराज मठ, दत्त चौक येथून प्रस्थान करणार आहे. सोलापूरकरांसाठी ही रथयात्रा म्हणजे घरबसल्या पंढरीच्या वारीचा भक्तिमय अनुभव घेण्याची संधी मानली जाते.

रथयात्रा दुपारी १२ वाजता मठातून निघाल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होईल. नवी पेठ, चौपाड, बाळीवेस, मधला मारुती आणि माणिक चौक या मार्गांवरून ही यात्रा जाणार असून, विविध ठिकाणी रथाचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता श्री शुभराय महाराज मठ येथे रथयात्रेची सांगता होईल.

या रथयात्रेत पारंपरिक वाद्यांचा निनाद, टाळ-मृदुंगाचा गजर आणि शेकडो वारकरी व भाविकांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

श्री शुभराय महाराज मठाला सोलापूरच्या इतिहासात विशेष मानाचे स्थान आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून मठाच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अखंडपणे जपली जात आहे.

मठ व्यवस्थापनाने सर्व नागरिक, भाविक आणि विठ्ठल भक्तांना या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्तीचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.

रथयात्रेच्या निमित्ताने विविध ठिकाणी रांगोळी साकारण्यात येणार असून, सामाजिक सेवाभावातून रांगोळी कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९१३०७४५५७३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande