नांदेड जिल्ह्यातील मोरे कुटुंबीयांचे खा. चव्हाण यांनी केले सांत्वन
नांदेड, 18 जुलै (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील बेंबर येथील शिक्षक स्व. सुनील मोरे आणि त्यांच्या दोन चिमुकल्यांच्या सारा व सुमित यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी जाऊन कुटुंब
अ


नांदेड, 18 जुलै (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील बेंबर येथील शिक्षक स्व. सुनील मोरे आणि त्यांच्या दोन चिमुकल्यांच्या सारा व सुमित यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तसेच दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या अत्यंत वेदनादायी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हळहळला आहे. या दुःखद प्रसंगात मोरे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.केली असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

शिक्षण व्यवस्थेतील कारभाराच्या विरोधामध्ये सुनील मोरे यांनी आत्महत्या केली आपल्या मुलांसह त्यांनी आत्महत्या केली त्यानंतर आज खासदार अशोक चव्हाण कुटुंबीयांचे सांत्वन रण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande