छ. संभाजीनगर - अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वपक्षीय समितीतर्फे अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै (हिं.स.) | लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती, जालना यांच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ सा
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 जुलै (हिं.स.) | लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती, जालना यांच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती होती व समितीचे अध्यक्ष किरण सिरसाठ यांनी प्रास्ताविक केले, तर कार्याध्यक्ष ज्ञानदेव नागरे यांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे यांच्या समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांचा समाजाने अंगीकार करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख पंडितदादा भुतेकर, समितीचे अध्यक्ष किरण सिरसाठ, उपाध्यक्ष इब्राहिम शेख, कार्याध्यक्ष ज्ञानदेव नागरे, सचिव संतोष मच्छिंद्र रासवे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, विविध पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande