परभणीत ‘तृतीय नाद ज्योती’ त्रैमासिक संगीत सभेचे आयोजन
परभणी, 18 जुलै (हिं.स.) : ज्ञानेश ध्रुपद संगीत व शिक्षण प्रसारक संस्था, परभणी आणि श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीय नाद ज्योती’ त्रैमासिक संगीत सभेचे आयोजन रविवार, दि. 19 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्य
परभणीत ‘तृतीय नाद ज्योती’ त्रैमासिक संगीत सभेचे आयोजन


परभणी, 18 जुलै (हिं.स.) : ज्ञानेश ध्रुपद संगीत व शिक्षण प्रसारक संस्था, परभणी आणि श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीय नाद ज्योती’ त्रैमासिक संगीत सभेचे आयोजन रविवार, दि. 19 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे.

या संगीत सभेची सुरुवात ज्येष्ठ गायक शंभूमहादेवराव देशमुख यांचे शिष्य सोहम देशमुख आणि कृष्णा जाधव यांच्या शास्त्रीय जुगलबंदी गायनाने होणार आहे. या सादरीकरणाला तबल्यावर माऊली पाथरकर तर हार्मोनियमवर ज्ञानेश्वरी कदम साथसंगत करणार आहेत.

यानंतर नांदेड येथील प्रसिद्ध कथक नृत्यांगना भार्गवी देशमुख यांचे कथक नृत्य सादरीकरण होणार आहे. त्यांच्या नृत्याविष्काराला तबल्यावर प्रशांत गाजरे, हार्मोनियमवर मंगेश जवळेकर, गायनासाठी जयश्री आजेगावकर तसेच पढंतसाठी वैभवी अन्नमवार यांची साथ लाभणार आहे.

या कार्यक्रमास ‘साक्षी इंडस्ट्रीज’ (कूलिंग मशीन उत्पादन, परभणी) आणि ‘श्री विठ्ठल डेव्हलपर्स अँड बिल्डर्स’ यांचे प्रमुख प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच ‘गोदातीर समाचार’, ‘जिजाऊ रेस्टॉरंट’ आणि न्युरॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विनायक ढगे हे सहप्रायोजक म्हणून सहभागी झाले आहेत. ‘मँडबॉक्स व्हिज्युअल्स, मुंबई’ आणि ‘वेदिका डिजिटल’ हे डिजिटल भागीदार म्हणून कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत.

शास्त्रीय संगीत आणि नृत्यकलेचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी रसिक, संगीतप्रेमी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्ञानेश ध्रुपदचे अध्यक्ष ऋतुराज भोसले आणि श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. यू. जाधव यांनी केले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande