संजय राऊत, किमान वाचून तरी रामरक्षेचे दोन श्लोक म्हणा; नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई, 18 जुलै, (हिं.स.)। जनाब संजय राऊत, तुमच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी किमान पुस्तकात वाचून तरी दोन-दोन श्लोक म्हणावेत. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा देवेंद्र
संजय राऊत, पोलिसांचा अपमान करू नका; नवनाथ बन यांची खरमरीत टीका


मुंबई, 18 जुलै, (हिं.स.)। जनाब संजय राऊत, तुमच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी किमान पुस्तकात वाचून तरी दोन-दोन श्लोक म्हणावेत. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा देवेंद्रजी सुरुवातीपासून आंदोलनात सहभागी होते आणि त्यात त्यांना 14 दिवसांचा तुरुंगवास झाला होता. तेव्हा तुम्ही कुठे होता? उद्धव ठाकरे तेव्हा मातोश्रीवर कॅमेरे साफ करत होते आणि संजय राऊत लेख लिहित होते. तुमचा आणि राम मंदिर आंदोलनाचा काहीही संबंध नाही. प्रभू रामचंद्रांचे सर्वात मोठे विरोधक कोण आहेत, हे महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने ओळखले आहे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला.

उद्धव ठाकरेंच्या आंदोलनासाठी सोनम वांगचूक यांच्यावर कारवाई केल्याचा संजय राऊत यांचा दावा हास्यास्पद असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले, अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून भाजपाने घडवून आणल्याचा दावा संजय राऊत यांनी केला नाही हेच महाराष्ट्राचे मोठे नशीब म्हणावे लागेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला तुमची नाटकीपणा पूर्णपणे ठाऊक आहे. उद्धव ठाकरेंना नम्र विनंती आहे की, हिंदुत्वाच्या तेजाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघभूमी नागपुरात आहे. ही सुवर्णसंधी साधून आजपर्यंत हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या संघभूमीवर नाक घासून माफी मागितली पाहिजे. त्यानंतरच हिंदू समाज उद्धवजींना माफ करू शकेल.

उद्धव ठाकरे यांचे हे रामरक्षा आंदोलन नसून पक्षरक्षा, आमदाररक्षा आणि नगरसेवकरक्षा आंदोलन आहे. लोकांमधील तुमच्याबाबतची सहानुभूती आणि जनाधार संपलेला आहे. कार्यकर्ते, आमदार, नगरसेवक सोडून जात आहेत आणि पक्ष गळतीच्या अवस्थेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रभू रामचंद्रांची आठवण झाली. परंतु या नाटकीपणामुळे उद्धवजींना कोणताही फायदा होणार नाही. काँग्रेसच्या सांगण्यावरून तुम्ही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुपस्थित राहिलात. ज्या समाजवादी पक्षाने रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, ज्या समाजवादी पक्षाचे हात रामभक्तांच्या रक्ताने माखलेले आहेत त्या समाजवादी पक्षासोबत तुम्ही इंडिया आघाडीत आहात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आधी इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी द्यावी मग नागपुरात आंदोलन करावे. तोपर्यंत रामरक्षा म्हणण्याचा आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेण्याचा अधिकार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना नाही.

महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी 14 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आणि देशाचे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी समर्थ आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही डाव रचले तरी ते यशस्वी होणार नाही. संजय राऊत, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही या म्हणीनुसार तुम्ही कशाही कितीही वाकडेतिकडे शब्द वापरले तरी त्याचा काही फरक पडत नाहीत. देवाभाऊंच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यातही उभा राहील, असे श्री. बन यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande