जगन्नाथ रथयात्रेनिमित्त पुण्यात रविवारी वाहतुकीत बदल
पुणे, 18 जुलै, (हिं.स.)। पुणे शहरातील इस्कॉन मंदिराच्या वतीने रविवारी (१९ जुलै) भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. रथयात्रेदरम्यान दुपारी १ ते रात्री
rto


पुणे, 18 जुलै, (हिं.स.)। पुणे शहरातील इस्कॉन मंदिराच्या वतीने रविवारी (१९ जुलै) भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. रथयात्रेदरम्यान दुपारी १ ते रात्री ७.३० वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल राहणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

रथयात्रेला स. प. महाविद्यालय येथून प्रारंभ होईल. त्यानंतर लोकमान्य टिळक रस्ता, पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, शगुन चौक, रमणबाग चौक, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व, जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, अलका टॉकीज चौक आणि पुन्हा टिळक रस्त्याने स. प. महाविद्यालय येथे रथयात्रेची सांगता होईल.

वाहतुकीतील बदलानुसार, अलका चौकाकडून टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी अलका चौक – लालबहादूर शास्त्री रस्ता – सेनादत्त चौक – मांगीरबाबा चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच पूरम चौकाकडून टिळक रस्त्याने डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बाजीराव रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. रथयात्रेदरम्यान नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande