मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणला २२ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी भाजप चिपळूण शहर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर अपरांत हॉस्पिटलमध्ये पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणला २२ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन


रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी भाजप चिपळूण शहर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर अपरांत हॉस्पिटलमध्ये पार पडणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन चिपळूण शहर मंडळाचे अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले आहे. शिबिराच्या आयोजनासाठी महिला मोर्चा अध्यक्षा रसिका देवळेकर, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम पिसे, शिबिराचे संयोजक संदीप भिसे तसेच सहसंयोजक संगीता पालकर परिश्रम घेत आहेत. रक्तदात्यांनी आपली नावे त्वरित नोंदवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande