रत्नागिरी : नीटमधील यशस्वी विद्यार्थी भावेश चव्हाणचा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून गौरव
रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । नीट परीक्षेत एसटी प्रवर्गात राज्यात पहिल्या आलेल्या भावेश चव्हाणचा रत्नागिरीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी गौरव केला. भावेशच्या अभूतपूर्व यशाचा गौरव करण्यासाठी शेलार इस्टेट सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभाच
नीटमधील यशस्वी विद्यार्थी भावेश चव्हाणचा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून गौरव


रत्नागिरी, 19 जुलै (हिं.स.) । नीट परीक्षेत एसटी प्रवर्गात राज्यात पहिल्या आलेल्या भावेश चव्हाणचा रत्नागिरीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी गौरव केला.

भावेशच्या अभूतपूर्व यशाचा गौरव करण्यासाठी शेलार इस्टेट सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नीट-यूजी २०२६ परीक्षेत एसटी प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम व देशात चौथा क्रमांक मिळवत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या भावेश सुरेश चव्हाणचा यावेळी शाल पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. भावेशने ७२० पैकी ६६६ गुण मिळवत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे, भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम ऊर्फ दादा ढेकणे, शहर सरचिटणीस नीलेश आखाडे, महिला शहराध्यक्षा भक्ती दळी, भावेश चव्हाणचे आई-वडील उपस्थित होते. शेलार इस्टेट सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी भावेशचे परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे विशेष कौतुक करत, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. रत्नागिरीसाठी हे यश अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande