लातूर-चाकूर नगरपंचायत अभ्यासिकेतर्फे नवनियुक्त नगराध्यक्ष भागवत फुलेंचा सत्कार
लातूर, 19 जुलै (हिं.स.)चाकूर येथील नगरपंचायत अभ्यासिकेच्या वतीने नुकताच चाकूरचे नूतन नगराध्यक्ष सन्माननीय भागवत भैय्या फुले यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. शहराच्या विकासाची महत्त्वपूर्ण जबाबदारी हाती घेतल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्
नवनियुक्त नगराध्यक्षांचा सत्कार


लातूर, 19 जुलै (हिं.स.)चाकूर येथील नगरपंचायत अभ्यासिकेच्या वतीने नुकताच चाकूरचे नूतन नगराध्यक्ष सन्माननीय भागवत भैय्या फुले यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. शहराच्या विकासाची महत्त्वपूर्ण जबाबदारी हाती घेतल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी आणि संयोजकांनी अशी आशा व्यक्त केली की, भागवत भैय्या यांच्या नेतृत्वाखाली चाकूर शहराचा सर्वांगीण विकास तर होईलच, पण सोबतच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अभ्यासिकेच्या सोयी-सुविधा अधिक दर्जेदार बनतील. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण आणि तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळेल, असा सार्थ विश्वास यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande