चंद्रपूर - महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद; दोन हजार रुग्णांनी घेतला उपचारांचा लाभ
, 19 जुलै (हिं.स.)। आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही नागरिकाचे उपचार थांबता कामा नयेत. शासनाच्या आरोग्य योजना आणि वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला वेळेवर आणि दर्जेदार
चंद्रपूर - महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद; दोन हजार रुग्णांनी घेतला उपचारांचा लाभ


, 19 जुलै (हिं.स.)। आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही नागरिकाचे उपचार थांबता कामा नयेत. शासनाच्या आरोग्य योजना आणि वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध सामाजिक, धार्मिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर तसेच भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे आयोजित मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे दोन हजार नागरिकांनी विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, उपचार आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande