‘छत्रपती संभाजीनगर’ शहराच्या नावाला साजेसा विकास झाला पाहिजे - पालिका सभापती
छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै (हिं.स.)। ‘छत्रपती संभाजीनगर’ शहराच्या नावाला साजेसा विकास झाला पाहिजे, कामाची गुणवत्ता व दर्जा टिकवून कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी आग्रही आहोत! असे छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे सभापती अनिल मकरिये यांनी सांगितले
अ

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांभोवती सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.. त्यावेळी ते बोलत होते.

महापुरुषांच्या स्मारकांचे सुशोभीकरण उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि वेळेत पूर्ण व्हावे तसेच नागरिकांच्या अपेक्षेनुसार प्रत्येक कामाची अंमलबजावणी व्हावी, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.. लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल आणि दर्जेदार असेल असेही त्यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

 rajesh pande