छ. संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसाठी टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै (हिं.स.) राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये ''देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह'' निमित्त छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसाठी टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना मंत्
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै (हिं.स.) राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये 'देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह' निमित्त छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसाठी टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की,खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून, संघभावना, शिस्त, समन्वय आणि परस्परांतील स्नेह अधिक दृढ करणारे प्रभावी माध्यम आहे. याच भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्साह, मैत्री आणि संघभावनेने परिपूर्ण वातावरणात ही स्पर्धा आनंदात संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande