लातूर : नवीन दोन सिटी बस मार्ग सुरु करण्याची नगरसेविका रागिणी यादव यांची मागणी
लातूर, 19 जुलै (हिं.स.)। प्रभाग क्र. ११ मधील नागरिकांच्या सोयीसाठी दोन नवीन सिटी बस मार्ग सुरू करण्याबाबतचे निवेदन नगरसेविका रागिणी यादव यांनी लातूर मनपा परिवहन सभापती कायमखानी यांची भेट घेऊन दिले आहे. या निवेदनत त्यांनी सांगितले की, जुना रेणापूर
रागिणी यादव


लातूर, 19 जुलै (हिं.स.)। प्रभाग क्र. ११ मधील नागरिकांच्या सोयीसाठी दोन नवीन सिटी बस मार्ग सुरू करण्याबाबतचे निवेदन नगरसेविका रागिणी यादव यांनी लातूर मनपा परिवहन सभापती कायमखानी यांची भेट घेऊन दिले आहे.

या निवेदनत त्यांनी सांगितले की, जुना रेणापूर नाका → आंबेजोगाई रोड → इंडिया नगर → एलआयसी ऑफिस → दीपज्योती नगर → सोलंकर चौक → सोहेल नगर चौक → रेल्वे स्टेशन व जुना रेणापूर नाका → इंडिया नगर → पंचशील चौक → नाईक चौक → स्वामी समर्थ मंदिर (एक नंबर चौक) → एमआयडीसी → हडको चौक → हडको कॉलनी अशा प्रकारे दोन नवीन सिटी बस मार्ग सुरु केले तर प्रभागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार असून, रेल्वे स्टेशन, एमआयडीसी, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व शहराच्या मध्यवर्ती भागाशी संपर्क अधिक सुलभ होईल.

नगरसेविका रागिणी यादव यांच्या मागणीला सभापती फैजलखान कायमखानी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande