बीड : महिला कर्मचाऱ्याच्या पतीला मारहाण प्रकरणी संस्थाचालकावर कारवाईची मागणी
बीड, 19 जुलै (हिं.स.)। शासकीय कार्यालयात महिला कर्मचार्याच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित संस्थाचालकावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघ आणि महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघ यांनी केली आहे. यासंदर्भ
संस्थाचालकावर कारवाईची मागणी


बीड, 19 जुलै (हिं.स.)। शासकीय कार्यालयात महिला कर्मचार्याच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित संस्थाचालकावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघ आणि महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघ यांनी केली आहे. यासंदर्भात बीड येथील सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, अंथरवणपिंप्री तांडा येथील निवासी आश्रमशाळेतील स्वयंपाकी सुरेखा विष्णू चव्हाण यांचा सहा महिन्यांचा पगार संस्थाचालक दिनेश पवार यांनी रोखून धरल्याचा तसेच हजेरी नोंदविण्यास मज्जाव केल्याचा आरोप आहे. पगाराची मागणी केल्यानंतर त्यांना अपमानास्पद अटी घालून मानसिक व आर्थिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande