
छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह’ अंतर्गत मनपा प्राथमिक शाळा, राहुलनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले..
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची मदत मिळावी, त्यांच्यात शिक्षणाची आवड अधिक वाढावी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी छोटासा हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाला बळ देण्याचा हा प्रयत्न पुढेही सातत्याने सुरू राहील..
यावेळी मुख्याध्यापक संपत इधाटे, मंडळाध्यक्ष मनदीप राजपूत, संतोष मरमठ, निखील तिवारी, मिलिंद काकडे, हिरा बिरुटे, प्रकाश घोरपडे, बाबा जाधव तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis