
छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै (हिं.स.)। भारतरत्न डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भाजपा कार्यालय येथे जिल्हा कार्यकर्ता संमेलन संपन्न झाले. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे सभापती अनिल मकरिये यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाच्या नेते पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या संमेलनात आगामी संघटनात्मक उपक्रम, जनसंपर्क आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रहित सर्वोच्च मानणाऱ्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis