विद्यापीठ परिसर हरित, पर्यावरणपूरक करण्यासाठी शासन कटिबद्ध - महाजन
नाशिक, 19 जुलै (हिं.स.)। नाशिकला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित शहर म्हणून विकसित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ''उन्नत नाशिक'' अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र परिसराला आदर्श ग्रीन कॅम्पस म्हणून विकसित कर
Government committed to


नाशिक, 19 जुलै (हिं.स.)। नाशिकला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित शहर म्हणून विकसित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'उन्नत नाशिक' अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र परिसराला आदर्श ग्रीन कॅम्पस म्हणून विकसित करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विद्यापीठ परिसर हरित व पर्यावरणपूरक करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र, मौजे शिवनई, ता.दिंडोरी येथे आज आयोजित 'मिशन ग्रीन मान्सून' अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके, आमदार गोकुळ गिते, ,विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस स्वामी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, बागेश्री मांडाळकर, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, गणेश गिते, अपूर्व हिरे यांच्यासह प्राध्यापक, नाशिक मधील विविध शिक्षण संस्थांचे विद्यार्थी, स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की, या अभियानाअंतर्गत विद्यापीठ परिसरात 62 एकर परिसरात सुमारे दिड हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते, यावर्षी लावलेली झाडे टिकविण्यासाठी वृक्षसंवर्धनावर अधिक भर देण्यात आला आहे. 'मिशन ग्रीन मान्सून' अंतर्गत ८ ते १० फूट उंचीची मोठी वृक्षरोपे आणून नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची लागवड करण्यात आली. प्रत्येक वृक्षासाठी संरक्षक व्यवस्था, नियमित पाणी, देखभाल आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला असून, ही झाडे शंभर टक्के सुरक्षित रहावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून ती वाढविणे आणि त्यांचे संगोपन करणे हीच पर्यावरण संवर्धनाची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande