शासनाचा अंगणवाडीतील खाऊ वाहून नेणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात; रात्री उशिरापर्यंत चौकशी
लातूर, 19 जुलै (हिं.स.)। शासनाचा अंगणवाडीतील खाऊ वाहून नेणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात; रात्री उशिरापर्यंत चौकशी लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगणवाडीतील लहान मुलांच्या खाऊचा साठा वाहून नेणारा एक ॲपे टेम्पो पोलिसांच्या ताब्यात
अंगणवाडी खाऊ


लातूर, 19 जुलै (हिं.स.)। शासनाचा अंगणवाडीतील खाऊ वाहून नेणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात; रात्री उशिरापर्यंत चौकशी

लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगणवाडीतील लहान मुलांच्या खाऊचा साठा वाहून नेणारा एक ॲपे टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. 18 जुलै) रात्री घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संबंधित खाऊची पडताळणी व चौकशी सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पिवळ्या रंगाचा ॲपे टेम्पो (क्रमांक MH-24 AT-7398) खाडगाव येथून उदगीरच्या दिशेने जात असताना एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना शहरप्रमुख मोहन दिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नांदेड रोडवरील विवेकानंद चौक परिसरात तो थांबवला. टेम्पोमध्ये अंगणवाड्यांमध्ये वाटपासाठी असलेला लहान मुलांचा खाऊ असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी वाहन विवेकानंद पोलीस ठाण्यात आणून दिले.

यानंतर विवेकानंद पोलीस ठाण्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील संबंधित अधिकारी राठोड व अन्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून खाऊच्या साठ्याची पडताळणी सुरू केली. खाऊ शासनाच्या वितरणासाठीच होता का, तसेच तो नियमानुसार वाहतूक केला जात होता का, याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.

या प्रकरणी अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande