छ. संभाजीनगर-फुलंब्रीमधील विकास कामांचे मंत्री अतुल सावेंच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै (हिं.स. ) : मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते फुलंब्री येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये फुलंब्री येथील श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.गावागावातील मंदिरे
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै (हिं.स. ) : मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते फुलंब्री येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये फुलंब्री येथील श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.गावागावातील मंदिरे ही श्रद्धेची केंद्रे असून समाजाला एकत्र ठेवणारी आणि संकटांशी लढण्याची प्रेरणा देणारी पवित्र स्थाने आहेत. दर्शनानंतर मंत्री अतुल सावे आणि आमदार अनुराधा चव्हाण यांनी स्थानिक नागरिकांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधत त्यांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्या आणि अडचणी निश्चितपणे सोडवण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली आहे यावेळी अतुल सावे, आमदार सुहास शिरसाठ तसेच ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande