स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन
बीड, 19 जुलै, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत ''जनसेवा सप्ताह'' विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात पर्यावरण संवर्
जनसेवा सप्ताहाचे आयोजन


बीड, 19 जुलै, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत 'जनसेवा सप्ताह' विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात पर्यावरण संवर्धन, आरोग्य, सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण, कृषी, युवक विकास तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील युवक पदाधिकारी, कार्यकर्ते बांनी समाज उपयोगी कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी केले आहे.

जनसेवा सप्ताहात वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, महिलांसाठी मार्गदर्शन व सक्षमीकरण कार्यक्रम, शेतकरी सन्मान, आधुनिक शेतीविषयक कार्यशाळा, युवक संकल्प शिबिरे, क्रीडा स्पर्धा, वारकरी सेवा उपक्रम तसेच सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख कार्याचा वारसा जपण्याच्या 2 उद्देशाने समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील युवक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना जनसेवा सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक तालुका, शहर आणि गावपातळीवर जास्तीत जास्त लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करून स्व. अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या विचारांना अभिवादन करावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी केले आहे. गवते यांनी सांगितले की, युवकांनी रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, महिला सक्षमीकरण, शेतकरी मार्गदर्शन, क्रीडा उपक्रम आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रमांचे नियोजन करून समाजहिताला प्राधान्य द्यावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande