बीड : बिंदुसरा नदीवरील पूल-कम-बंधारा कामाची खा. बजरंग सोनवणे यांनी केली पाहणी
बीड, 19 जुलै (हिं.स.)। बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बिंदुसरा नदीवरील सुरू असलेल्या पूल-कम-बंधारा कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे
खासदार बजरंग सोनवणे


बीड, 19 जुलै (हिं.स.)। बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बिंदुसरा नदीवरील सुरू असलेल्या पूल-कम-बंधारा कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे नियोजन तसेच दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याबाबत माहिती घेण्यात आली. नागरिकांच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, पूल-कम-बंधारा पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम होण्यासोबतच पाणी साठवण क्षमतेतही वाढ होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

खासदार बजरंग सोनवणे यांनी कामाचा दर्जा कायम राखत कोणताही हलगर्जीपणा न करता निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळणार असून विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande