
नांदेड, 19 जुलै (हिं.स.)मुखेड-कंधार मतदारसंघातील मुखेड तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुखेड आगारासाठी नवीन बस गाड्या मंजूर करून आणण्यात यशस्वी झालो. असे मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार तुषार राठोड यांनी सांगितले
मुखेड आगारात उपस्थित राहून या नवीन बस गाड्यांचे लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक वर्षी माझ्या मतदारसंघातील जनतेला सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळावी याकरिता नवीन बस गाड्या मंजूर करून आणण्याचा प्रयत्न असतो. असे सांगताना ते म्हणाले,पुढेही हा पाठपुरावा असाच सुरू राहील. मतदारसंघातील प्रत्येक तांडा, वाडी आणि गावाला विकासाच्या प्रवाहात जोडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
लोकार्पणापूर्वी माता राणीचे दर्शन घेऊन नवीन बस गाड्यांचे पूजन केले आणि बस मधून प्रवासाचा आनंदही घेतला. याप्रसंगी मुखेड आगाराचे प्रमुख सुभाषराव पवार, माजी नगराध्यक्ष गंगाधररावजी राठोड, विधानसभा प्रमुख खुशालराव पाटील उमरदरीकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि आगाराचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis