
नांदेड, 19 जुलै (हिं.स.) । भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण भेट घेतली.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्यानंतर, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खा. अशोकरावजी चव्हाण यांची त्यांच्या शिवाजीनगर, नांदेड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आभार मानले. याप्रसंगी बँकेच्या आगामी उर्वरित १२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि रणनीतीबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी नेताजीराव भोसले (शहर सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), कन्हैया कदम (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी), मोहसीन खान पठाण (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस), संजय अंभोरे, प्रल्हादराव उमाटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis