अहमदपूरच्या विकासाला नवी गती; १५ कोटींच्या अधिकारी-कर्मचारी निवासस्थान प्रकल्पाचे सोमवारी भूमिपूजन
लातूर, 19 जुलै (हिं.स.)। शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार असून, प्रशासकीय कामात सुसूत्रता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने अहमदपूर येथे १५ कोटी रुपये खर्चाच्या अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम प्र
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील


लातूर, 19 जुलै (हिं.स.)। शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार असून, प्रशासकीय कामात सुसूत्रता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने अहमदपूर येथे १५ कोटी रुपये खर्चाच्या अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता संपन्न होणार असून, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. श्री. बाबासाहेबजी पाटील यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाची कोनशिला रचली जाईल. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हक्काच्या व दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे दूर होणार असून, यामुळे प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मोठी मदत होणार आहे.

अहमदपूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय मानला जात असून, सर्व्हे क्र. २६, शासकीय वसतिगृहाजवळ, मरशिवणी, अहमदपूर येथे आयोजित या सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण भूमिपूजन सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अहमदपूरच्या समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande