नाशिक : रिंग रोडच्या मुद्द्यावर, निश्चितपणे मार्ग काढणार - मंत्री गिरीश महाजन
नाशिक, 19 जुलै (हिं.स.)। रिंग रोडच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, “या प्रकरणात १५ ते २० टक्के शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्याबाबत नुकताच निर्णय देण्यात आला आहे. त्या ठिकाणी जाऊन गायकर यांची भेट घेणार असू
On the issue of Ring Road


नाशिक, 19 जुलै (हिं.स.)। रिंग रोडच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, “या प्रकरणात १५ ते २० टक्के शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्याबाबत नुकताच निर्णय देण्यात आला आहे. त्या ठिकाणी जाऊन गायकर यांची भेट घेणार असून, निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “शहरातील सर्व दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यात येईल. त्यासाठी एसटीपी प्लांटचे काम हाती घेतले असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मी काय बोलणार? स्पष्ट बहुमत आमच्याकडे आहे. राज्यात त्यांचं काय राहिलं याचा त्यांनी विचार करावा. आमच्या जो बहुमताकडे न पाहता आपला पक्ष कसा वाचवता येईल याकडे त्यांनी लक्ष द्यावे.”आम्ही कुठे काय कापत आहोत, तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा. अनेक लोक फुटण्याच्या मार्गावर आहेत. खासदार राहिले नाहीत, आमदारांचीही तीच अवस्था आहे. आम्ही कुणाला झुकवत नाही. लोकचविरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवत आहेत. त्यांनी स्वप्न बघावीत, पण ती मुंगेरिलाल के हसीन स्वप्नांसारखी आहेत. त्यांचं काही राहिलेलं नाही, तरी घोषणा सुरू आहेत. उद्धवजींच्या प्रत्येक स्टेटमेंटवर बोलणे मला योग्य आणि आवश्यक वाटत नाही. आज सगळा देश मोदीमय झाला आहे. जगभरात नंबर एकचा नेता म्हणून मोदींचे नाव घेतले जाते. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले, त्यातून ठाकरेा काय शिकले माहिती नाही. अडीच वर्ष मंत्रालयात आले नाहीत, घराची पायरी ओलांडली नाही. स्वतः गाडी चालवत जात होते,” असा टोलाही मंत्री महाजन यांनी लगावला.

आमदार सरोज अहिरे यांच्या भूमिकेबाबत नाराजी

लोडशेडिंगच्या मुद्द्यावर आमदार सरोज अहिरे यांच्या भूमिकेबाबत महाजन म्हणाले, “याबाबत मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. अशी पद्धत योग्य नाही. लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडली पाहिजे.” “तुमचा विषय काय आहे ते मांडा, निवेदन द्या, फोटो काढा. मुख्यमंत्री तुमच्याशी फोनवर बोलतात आणि ते स्पीकरवर रेकॉर्ड करून लोकांना ऐकवणे योग्य नाही,” असे महाजन म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande