बीड जिल्हा परिषदेतून ५७ लाखांच्या कामाची मूळ निविदा फाईल पळवली; शहर पोलिसांत गुन्हा दाखल
बीड, 19 जुलै (हिं.स.)। बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक २ च्या कार्यालयातून ५७ लाख रुपयांच्या शासकीय कामाची मूळ निविदा फाईल (संचिका) विश्वास संपादन करून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कार्यालयातील महिला कनिष्ठ स
पोलीस कारवाई


बीड, 19 जुलै (हिं.स.)। बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक २ च्या कार्यालयातून ५७ लाख रुपयांच्या शासकीय कामाची मूळ निविदा फाईल (संचिका) विश्वास संपादन करून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कार्यालयातील महिला कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) राधा नारायणराव बांगर यांच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख सरफराज (रा. सिरसाळा, ता. परळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिरसाळा ग्रामपंचायत स्तरावरून 'नमो ग्राम सचिवालय' इमारत बांधकामासाठी ५७ लाख रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले होते. या कामाच्या मूळ कागदपत्रांचा संच २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास काम पूर्ण झाल्यानंतर देयके लिहिण्याच्या कारणावरून आरोपीने स्वतःच्या ताब्यात घेतला होता. शासकीय कागदपत्रे असल्याने कार्यालयाकडून देयके अदा करण्यासाठी शेख सरफराज याच्याकडे या फाईलची वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, आरोपीने मूळ निविदा संचिका कार्यालयाकडे सादर न करता 'सदर संचिका माझ्याकडे नाही' अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर हा कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande