छत्रपती संभाजीनगर-गीताबन अबॅकस ट्रेनिंग' मोफत प्रशिक्षण उपक्रम
छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै (हिं.स.) गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना मराठवाडा स्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात आले आहे आमदार प्रशांत
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 जुलै (हिं.स.) गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना मराठवाडा स्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात आले आहे आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमात याचे नियोजन करण्यात आलेआमदार प्रशांत बंब यांच्या संकल्पनेतून साकारलेला महाराष्ट्रातील एकमेव 'गीताबन अबॅकस ट्रेनिंग' हा मोफत अबॅकस प्रशिक्षण उपक्रम गंगापूर व खुलताबाद मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया ठरत आहे. या उपक्रमातील विद्यार्थ्यांनी विभागीय मराठवाडा स्तरीय अबॅकस स्पर्धेसाठी उत्साहाने प्रस्थान केले.या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांना घडविणाऱ्या प्रशिक्षकांना आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिल्याचे आमदार बंब यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande